Friday, August 24, 2018


मालवाहू वाहनांच्या माल
वाढीव भार क्षमतेत सुधारणा
नांदेड, दि. 23 :- मालवाहू वाहनातून नेण्यात येणाऱ्या माला संदर्भात या वाहनांना वाढीव भार क्षमतेत (GVW) सुधारणा करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व वाहन चालक, मालकानी पुढील बाबींची पूर्तता करुन आपल्या वाहनाच्या GVW मध्ये सुधारणा करुन घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड  यांनी केले आहे.
याबाबत वाहनाचे मूळ नोंदणी प्रमाणपत्र (R.C.) तसेच मूळ परवानासह सर्व वैध कागदपत्रे व अर्ज. दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र व परवाना शुल्क तसेच वाढीव वजनाच्या फरकाचा व्याजासह कर या बाबींची पूर्तता करावी. संबंधितांनी  याबाबतची नोंद घ्यावी, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...