Friday, August 24, 2018


माहूर येथील पंचक्रोषी यात्रेनिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 24 :- नारळी पोर्णिमेनिमित्त माहूर येथे पंचक्रोषी यात्रेचे कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व जिल्ह्यात शांतता अबाधीत रहावी म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये शनिवार 25 ऑगस्ट ते सोमवार 27 ऑगस्ट 2018 च्या मध्यरात्री पर्यंत माहूर येथील पोलीस निरीक्षक एल. व्हि. राख पोस्टे माहूर स्वाधीन अंमलदार यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.  
माहूर येथे मोठ्या प्रमाणात पंचक्रोशी यात्रा 25 ते 27 ऑगस्ट 2018 या कालावधीत भरणार आहे. या महोत्सव काळात प्रत्येक दिवशी 60 ते 70 हजार भाविक यात्रेकरु महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातून खाजगी वाहने घेऊन येतात. श्री दत्तशिखर, अनुसया माता मंदिर, देवदेवेश्वरी, रेणुकामाता मंदिर, सर्वतीर्थ, वनदेव, मातृतीर्थ अशा ठिकाणी दर्शनासाठी जातात. हा रस्ता अरुंद असून पावसामुळे बराचसा खराब झाला आहे. सर्वच वाहने वर गेल्यास वाहतुकीस अडचण निर्माण होऊ शकते. देवस्थाने ही जंगलात असून अंतरा-अंतरावर आहेत. 
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे- रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्यारितीने चालावे व कसे वागावे ? हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जाणे किंवा जाऊ नये ? हे ठरविण्यासाठी. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजे-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्यासाठी. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेच्या ठिकाणी व इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबाद्दल किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविणे आणि शींगे इतर वाद्य कर्कश वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबाबत आणि त्यावर नियमण ठेवणेबाबत. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुचना देण्यासंबंधी. मुंबई पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्ठी देणारे सुव्यवस्था योग्य आदेश देण्याबाबत.  
हा आदेश लागू असेपर्यंत माहूर येथील पोलीस निरीक्षक यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावे. सदर जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रेत, समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जारी केले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...