बांधकाम कामगारांसाठी
विशेष नोंदणी अभियान सुरु
नांदेड दि. 2 :- अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम
कामगारांसाठी 2 ते 31 जुलै 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान
राबविण्यात येत आहे. या अभियानात प्रत्यक्ष बांधकामाच्या साईटवर जाऊन कामगारांची
नोंदणी करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांनी या नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
सहाय्यक कामगार आयुक्त वाय. एस. पडियाल यांनी केले आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व क्रीडाई नांदेड यांच्या
संयुक्त विद्यमाने या नोंदणी अभियानाचे काम सुरु करण्यात आले आहे. या
अभियानांतर्गत शंभर ते 125 लाभार्थी बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.
यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष गणेश कल्याणकर,
बी. शिवकुमार तसेच क्रीडाईचे इतर पदाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल,
सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख उपस्थित होते.
बांधकाम कामगारांनी या नोंदणी अभियानात आपला सक्रीय
सहभाग नोंदवून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व
योजनांचा लाभ घ्यावा. तसेच बांधकाम क्षेत्रातील निगडीत असलेल्या सर्व बांधकाम
व्यावसायिक, ठेकेदार यांनी त्यांचेकडे काम करत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांची
नोंदणी करावी. बांधकाम क्षेत्रात इतरत्र काम करणाऱ्या बांधकाम कामगारांने देखील
नोंदणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय नांदेड उद्योग भवन तळ मजला
औद्योगिक वसाहत शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार
आयुक्त वाय. एस. पडियाल व सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment