हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या
जन्मदिनानिमित्त
आमदार चिखलीकर यांचे हस्ते आज
लोहा तहसिल परिसरात वृक्षारोपन
नांदेड, दि. 30 :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित
क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आमदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 1 जुलै रोजी दुपारी 1 वा. लोहा तहसिल कार्यालयाच्या
प्रांगणात वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे
सन 2018 या वर्षात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. याचाच एक भाग म्हणून
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात 1
जुलै रोजी दुपारी 1 वा. वृक्षारोपन करण्यात येणार आहे. यावेळी कंधारचे उपविभागीय
अधिकारी प्रभोदय मुळे यांची उपस्थिती राहणार आहे.
सदर वृक्षारोपन
कार्यक्रमास लोहा तालुक्यातील सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख, अधिकारी / कर्मचारी
तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक आदिंनी मोठया प्रमाणावर उपस्थित
राहून वृक्षारोपन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन तहसिलदार डॉ. आशिषकुमार
बिरादार यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसिलदार एस.पी.
जायभाये, एस.एम. देवराये व ईतर अधिकारी / कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
00000
No comments:
Post a Comment