Saturday, June 30, 2018


एकच लक्ष्‍य 13 कोटी वृक्ष
तालुका स्तरीय 3 लाख 42 हजार वृक्ष
लागवडीचा अंबाळा येथे आज शुभारंभ
नागरिकांना सहभागाचे आवाहन  
नांदेड, दि. 30 :- राज्यात 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत होणाऱ्या 13 कोटी वृक्ष कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय 3 लाख 42 हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ हदगाव तालुक्यातील अंबाळा येथील राखीव वन कक्ष क्र. 493 येथे रविवार 1 जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून आ. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, सहायक वनसंरक्षक डी. एस. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. तर पंचायत समिती सभापती सुनिताताई दवणे, तहसिलदार संदीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक डी. के. चौरे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, पंचायत समिती सदस्य लताताई निळे, आंबाळाचे सरपंच सौ. जयश्री पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नागरिकांनी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन हदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) शरयु रुद्रावार, सौ. सुषमा मोतेवार, अंबाळा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्यावतीने करण्‍यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...