Saturday, June 30, 2018


उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयातील
सरळसेवा भरतीतील उमेदवारांना आवाहन
लातूर, दि.30- आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत सरळसेवा भरती-2016 मध्ये उपसंचालक, आरोग्य सेवा, लातुर यांच्या अस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मुळ कागदपत्राची तपासणी व समुपदेशन प्रक्रिया 2 जुलै 2018 सोमवार रोजी सकाळी 9 वा. होणार आहे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) यांच्या अधिनस्त बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, नियमित क्षेत्र कर्मचारी तसेच जिल्हा शल्य चिकित्स नांदेड व उस्मानाबाद यांच्या अधिनस्त गट- ड संवर्गातील उमेदवारांसाठी 3 जुलै 2018 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता नियोजित केले आहे. ही प्रक्रीया उपसंचालक, आरोग्य्कार्यालय आरोग्य संकूल इमारत, शासकीय वसाहत, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, बाशी रोड, लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
या समुपदेशनासाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या पत्यावर याबाबत पत्र पाठविण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या मोबार्दल क्रमांकावर एसएमएस द्वारे सूचना पाठविण्यात आलेल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पत्र प्राप्त्झाले नसल्यास या कार्यालयात येवून त्या पत्राची अगावू प्रत प्राप्त करुन घेवू शकतात.समुपदेशनाचे दिवशी पदस्थापना निश्चित करुन नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार नाहीत यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपसंचालक, आरोग्य्यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...