Monday, April 9, 2018


मतदार ओळखपत्र छायाचित्रासाठी आवाहन
नांदेड , ‍दि. 9 :- मतदारांनी रंगीत फोटो संबंधीत बीएलओ, तलाठी, अथवा तहसिल कार्यालय नांदेड येथे शुक्रवार 20 एप्रिल 2018 पर्यंत जमा करावीत. त्यानंतर दहा अंकी नवीन डिजीटल रंगीत मतदान कार्ड मिळेल. फोटो मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधीत मतदाराचे नाव मतदार यादीतून कायमस्वरुपी स्थलांतरीत समजून वगळण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.      
मतदार याद्या अचूक व परिपूर्ण करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मतदार यादीत 86- नांदेड उत्तर मतदारसंघात 484 तर 87- दक्षिणमध्ये 766 मतदारांचे छायाचित्रे नाहीत. याबाबत संबंधीत बीएलओ व तलाठी यांचेमार्फत मागील दिड महिन्यांपासून सूचना देण्यात आल्या आहेत. मतदार याद्या nanded.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच 86- नांदेड उत्तरमध्ये 8 हजार 1 व 87-दक्षिण विधानसभा मतदारसंघात 7 हजार 764 मतदारांचे जूने सोळा अंक मतदान कार्ड ज्यावर काळे धवल फोटो आहे. मतदारांची यादीही सर्व महानगरपालिका क्षेत्रिय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथेही उपलब्ध आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...