Monday, April 9, 2018

संजय गांधी निराधार योजना समितीच्‍या बैठकीत 248 लाभार्थ्‍यांना लाभ मंजूर

लोहा तालुक्‍यातील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आज सोमवार दि. 9 एप्रिल रोजी घेण्‍यात आली. त्‍यात समितीने 248 लाभार्थ्‍यांना लाभ मंजूर केला आहे.

संजय गांधी निराधार योजना समिती तालुका लोहाचे अध्‍यक्ष रामभाऊ चन्‍नावार, हौसाजी रामजी कांबळे सदस्य, अर्जुन राठोड सदस्य यांच्‍या उपस्थितीत बैठक घेण्‍यात आली. सदर बैठकीस डॉ. आशिषकुमार बिरादार तहसिलदार लोहा, पी.पी. फांजेवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा,नायब तहसिलदार एस.पी. जायभाये आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत ऑनलाईन केलेले सर्व अर्ज व त्‍या सोबत संलग्‍न कागदपत्रांचे पुरावे तपासून प्रत्‍येक अर्जावर निर्णय घेण्‍यात आला. त्‍यात संजय गांधी निराधार योजनेचे 122 अर्ज, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दपकाळ योजनेचे 63, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजनेचे 63 असे एकुण 248 अर्ज मंजूर करण्‍यात आले. आजरोजी एकही अर्ज प्रलंबित नाही. सदर मंजूर लाभार्थ्‍यांची यादी तहसिल कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डवर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. मंजूर लाभार्थ्‍यांना खाते उघडण्‍यासाठी पत्र देण्‍यात येणार असून त्‍यांचे खाते उघडण्‍यात आल्यानंतर त्‍यांना अनुदान चालू करण्‍यात येणार आहे.

सदर बैठक यशस्‍वी करण्‍यासाठी अव्‍वल कारकुन श्रीमती एस.आर.वाळुक्‍कर, पी.पी.बडवणे, लिपिक एस.बी.धोंडगे,राजेश भदरगे, संगमेश्‍वर टोपारे,माधव काकडे, नारायण यमलवाड, नवनाथ गिरी यांनी योगदान दिले.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...