आयटीआय पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना
अंतीम प्रमाणपञ प्राप्त करुण घेण्याची संधी
नांदेड
दि. 5 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथून सन 1980 ते 2017 या कालावधीत आयटीआय पूर्ण केलेल्या ज्या
प्रशिक्षणार्थ्यांचे अंतीम प्रमाणपञ अद्याप पर्यंत प्राप्त झाले नाहीत. ज्यांच्या
अंतिम प्रमाणपञांमध्ये दुरुस्ती करावयाची आहे किंवा ज्यांचे अंतीम प्रमाणपञ हरवले व
दुबार प्रमाणपञ हवे आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी रविवार 8
एप्रिल 2018 पर्यंत नमूद पुराव्यासह संस्थेत समक्ष येऊन अर्ज
सादर करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
अंतीम
प्रमाणपञ प्राप्त झाले नाही अशा उमेदवारांनी- आय.टी.आय. उत्तीर्ण असल्याबाबत पुरावा
सादर करावा. ज्या बाबीमध्ये दुरुस्ती करावयाची आहे, ( उदा.
स्वत:चे नाव, वडीलांचे नाव, जन्मतारीख,
प्रशिक्षण कालावधी आणि उत्तीर्ण महिना व वर्ष) त्याबाबीच्या
अनुषंगिक योग्य कागदपञे पुराव्यासाठी जोडण्यात यावीत (उदा. शाळा सोडल्याचा दाखला,
माध्यमिक शालान्त प्रमाणपञ इ.). दुय्यम प्रमाणपञ हवे असल्यास- 1.
प्रमाणपञ हरवल्याचा पोलिस स्टेशनचा प्रथम खबरी अहवाल (F.I.R.)
प्रत. रुपये 100 च्या स्टॅम्प पेपरवरील शपथपञ.
हरवलेल्या प्रमाणपञाची झेरॉक्स प्रत असल्यास.
निकालपञाची सत्यप्रत. नियमानुसार आवश्यक शुल्क पावतीची प्रत जोडावी, असेही
प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment