Friday, February 2, 2018

आनंदी राहणे हेच उत्तम आरोग्याचे औषध
- डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर
नांदेड दि. 2 :-   आनंदी राहून आपल्या शैक्षणिक कार्यात स्वत:ला झोकून द्यावे हेच उत्तम आरोग्याचे औषध आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजाता जोशी पाटोदकर यांनी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महिला तक्रार निवारण समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी मुलींना कायदेविषयक बाबींची माहिती देण्यासाठी नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य विणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. डी. पोपळे हे होते.
मुलींनी वयात येताना होणाऱ्या बदलाची माहिती रंजक पद्धतीने सांगतानाच चुकीच्या अंधश्रद्धा न बाळगण्याचे सांगितले. बाह्य सौंदर्यापेक्षा कर्तत्वाचे सौंदर्य जपा असा मोलाचा सल्लाही डॉ. पाटोदेकर यांनी मुलींना दिला. प्राचार्या वीणा पाटील यांनी स्वसंरक्षणार्थ विविध कायद्याची माहिती दिली. अन्याय झाल्यास न भिता योग्य पद्धतीने त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे व होणारा छळ टाळण्याचे आवाहन केले. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने मुली व महिलांसाठी मार्गदर्शक ठरणारा चर्चा व परिसंवाद कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महिला तक्रार निवारण समितीचे प्राचार्य पी. डी. पोपळे यांनी अभिनंदन केले. यावेळी मंचावर महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. एस. व्ही. बिट्टीगिरी, आयएसटीचे प्रभारी प्रा. दातीर, प्रा. डॉ. जी. एम. डक यांची उपस्थिती होती. कार्यकमाचे सुत्रसंचालन कु. आर. के. देवशी तर आभार डॉ. ए. ए. जोशी यांनी मानले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...