Friday, February 2, 2018

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे  
जिल्ह्यात 10 फेब्रुवारीला आयोजन  
नांदेड दि. 2 :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 10 फेब्रुवारी 2018 राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले आहे. सर्व संबंध पक्षकारांनी यासंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.  
या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय सहकार न्यायालय नांदेड येथे करण्यात आले आहे. लोकन्यायालयात प्रलंबित 2 हजार 500 प्रकरणापैकी 1 हजार दिवाणी 1 हजार 500 फौजदारी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. दिवाणी प्रकरण, मो..दावा प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे, बॅंक कर्ज वसुली प्रकरण आदी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तडजोड पात्र आहेत अशी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विद्युत कंपनी, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबत दाखल पुर्व प्रकरणे, विविध मोबाईल कंपन्यांची थक रकमेबाबत प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार असुन आतापर्यंत 6 हजार दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत.
            या राष्ट्रीय न्यायालयातीत नांदेड अभिवक्तासंघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, उपाध्यक्ष अॅड.  जगजीवन भेदे, अमरीकसिंघ वासरीकर, जिल्हा सरकारी की तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सर्व संबंध पक्षकारांनी यासंधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे  यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...