जिल्हा कृषि महोत्सवात
सहभागासाठी माहिती देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- जिल्हा
कृषि महोत्सवाचे आयोजन 21 ते 25 मार्च 2018 या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती
नवा मोंढा नांदेड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांशी निगडीत माहिती,
प्रात्यक्षिके, जीवंत नमुने, प्रक्रिया उद्योग, सुधारीत औजारे आदी माहितीचा सहभाग
असणार आहे. महोत्सवात सहभाग घेण्यासाठी माहिती संबंधीतांनी मंगळवार 27 फेब्रुवारी 2018
पर्यंत प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, नवा मोंढा नांदेड येथे सादर करावी, असे
आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा नांदेड यांनी केले आहे.
जिल्हा
कृषि महोत्सवात शासकीय दालनात 40 स्टॉल, कृषि निविष्ठा 30 स्टॉल, कृषि तंत्रज्ञान
व सिंचन 30 स्टॉल, गृहोपयोगी वस्तू 40 स्टॉल, धान्य महोत्सव 20 स्टॉल, खाद्य
पदार्थ 20 स्टॉल असे अंदाजे 200 स्टॉलचा समावेश आहे. शासकीय कार्यालयास स्टॉल
विनामुल्य आहेत. सुसज्ज माहितीसह स्टॉल उभारणीबाबत आवश्यक ती कार्यवाही संबंधीत
कार्यालय प्रमुखांना करावी. शासनाने शेतकऱ्यांना विविध कृषि योजना, उपक्रम,
संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ,
पुरक व्यवसाय इत्यादी बाबत मार्गदर्शन व्हावे तसेच कृषि विषयक परिसंवाद,
व्याख्याने तसेच थेट उत्पादक ते ग्राहक विक्री व्हावी या उद्देशाने जिल्हा कृषि
महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
यामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, विविध महामंडळे बरोबरच इतर सर्व
शासकीय यंत्रणा, खाजगी कंपन्या, बचतगट, उद्योजक यांचा सहभाग अपेक्षित आहे. अधिक
माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय नांदेड, संतोष बीज भांडार जवळ नवा मोंढा
नांदेड येथे दूरध्वनी क्र. 02462-284428 ईमेल pdatmananded@gmail.com वर
संपर्क सधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment