प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक
भूमिकेतून
समाजाचा विकास घडतो : जी.
श्रीकांत
लातूर, दि.15 :- प्रत्येक व्यक्तीची दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र
वाचनाने होते. शासन आणि समाज यांच्यामधील संवादक म्हणून प्रसार माध्यमे काम करतात.
समाजातील व्यक्तीचा विकास समोर ठेवून प्रसार माध्यमांनी सकारात्मक भूमिकेतून काम
केल्यामुळे देशाचा विकास होतो, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्र सूचना कार्यालय आणि जिल्हा माहिती
कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटन
प्रसंगी आज येथे व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपसंचालक
(माहिती) यशवंत भंडारे, जयप्रकाश दगडे, वस्तू व सेवाकर उपायुक्त जी.एस.गवंडी, लीड
बँकेचे व्यवस्थापक शंकर बोर्डे, दै.यशवंतचे ओमप्रकाश मोतीपवळे, रविंद्र जगताप,
सहायक संचालक (माहिती) मीरा ढास यांच्यासह मोठया संख्येने पत्रकार बांधव उपस्थित
होते.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक पत्र सूचना कार्यालयाचे
सहायक संचालक नितीन सप्रे यांनी करुन कार्यशाळा आयोजना मागील उद्देश स्पष्ट केला. केंद्र
शासनामार्फत प्रसारमाध्यमांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांची माहिती संगणकीय सादरणाद्वारे दिली. त्याचबरोबर
शासनाच्या विविध योजनांची माहिती पत्रकारांच्या मार्फत विविध माध्यमांना
शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाते, याविषयीची माहिती त्यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांचे विकास पत्रकारिता
या विषयावर भाषण झाले. ते म्हणाले की, स्वता:तील मीपणा संपूवन विकास पत्रकारिता केली
जावी. माणसाचा विकास केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या दिशेने वाटचालीत
प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. प्रत्येकाच्या मनात विकासाची
प्रेरणा निर्माण करणाऱ्या विकास पत्रकारितेकडे पत्रकारांनी लक्ष द्यावे, असेही
त्यानी यावेळी सांगितले.
श्री.शंकर बोर्डे यांनी उद्योगाच्या वाढीसाठी शासन
प्रयत्न करीत असून मुद्रा योजनेतंर्गत सुशिक्षित बेराजगारांना रोजगार उपलब्ध करुन
देण्याची संधी शासनाने उपलब्ध केल्याची माहिती दिली. वृत्तपत्रांच्या माध्यमातून
पत्रकारांनी समाजातील गरजूपर्यंत मुद्रा योजनेची माहिती पोहचविण्याचे काम करावे,
अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी आपत्ती व्यवस्थापनात
प्रसारमाध्यमाची नेमकी कोणती भूमिका असावी. या संदर्भात जागतिक स्तरावरील नैसर्गिक
आपत्तीच्या वेळी विविध घटना प्रसार माध्यमाची भूमिका समाजासाठी कशी साहय्यभूत
ठरली. तसेच आपत्तीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी, याविषयीचे मार्गदर्शन त्यांनी
केले. पत्रकारांनी आपत्तीच्या वेळी मानसिक संतूलन बिघडू न देता प्रशासनास
सहकार्याची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी रविंद्र जगताप यांनी सोशल मीडिया विषयी मार्गदर्शन
केले. माध्यमातील काळानुरुप झालेला बदल यात वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिन्या, ऑनलाईन
आवृत्ती, वेब आणि पत्रकारिता समाज माध्यमाची भूमिका याविषयी अनुभवावर आधारित
मार्गदर्शन केले. समाज माध्यमाचा योग्य वापर केला तर समाजावर चांगला परिणाम होईल. समाज
मनावर ज्या प्रमाणात चांगल्या विचाराचे अनुकरण केले तर चांगला परिणाम होतो. तसेच समाजाचा
विकास होण्यात समाज माध्यमांचा चांगला उपयोग केला तर मदत होईल, असेही ते म्हणाले.
याचबरोबर नव्याने लागू झालेल्या जीएसटी (वस्तू व सेवा
कर प्रणाली ) विषयी श्री.गवंडी यांनी
देशातील करप्रणालीमध्ये झालेला बदल, उद्योग, व्यापारामध्ये या धोरणामुळे आलेली पारदर्शकता
तसेच देशाच्या विकासात या करप्रणालीचे योगदान या विषयी माहिती दिली.
कार्यशाळेच्या शेवटी अन्य सहभागी पत्रकारांनी मनोगत
व्यक्त केले त्यात त्यांनी अशा
कार्यशाळेचे आयोजन पत्रकारांना दिशादर्शक असून तालुका स्तरावर अशा कार्यशाळेचे
आयोजन करण्यात यावे, अशी सूचना पत्र सूचना कार्यालयाकडे केली. नितिन सप्रे आभार यांनी मानले.
****
No comments:
Post a Comment