मुद्रा बँक योजनेचा लाभ
बेरोजगार तरुणांना द्यावा
--- जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे
नांदेड,दि.27:- मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत - जास्त गरजू आणि बेरोजगार तरुणांना मिळावा यासाठी या
योजनेचा शहरी, ग्रामीण, दुर्गम, अती दुर्गम आणि आदिवासी व नक्षलग्रस्त भागात
प्रभावीपणे जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. नांदेड
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत
ते बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, मानव
विकासचे नियोजन अधिकारी डी.बी. सुपेकर, उद्योजक सतिष सामंते, जिल्हा अग्रणी बँकेचे
महाव्यवस्थापक विजय उशीर, नांदेड आकाशवाणी केंद्राचे संचालक भिमराव शेळके, स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे स्कूल ऑफ मास. कम्युनिकेशनचे संचालक डॉ. दिपक
शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक नईम कुरेशी, आरसेटीचे संचालक दिलीप शिरपूरकर
तसेच विशेष निमंत्रित सदस्य आदिंची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात 31 डिसेंबर, 2017 पर्यंत एकूण 11 हजार
914 कोटींचे कर्ज वाटप झाले असून कर्ज वाटपात महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या
क्रमांकावर आहे. तसेच मुद्रा बँक योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यात जानेवारीअखेर शिशू
गटामध्ये 1 लाख 32 हजार 116 प्रकरणात, रुपये
317 कोटी 65 लाख, किशोर गटाच्या 3 हजार 304 प्रकरणामध्ये, रुपये 79 कोटी 20 लाख आणि तरुण गट 709 प्रकरण रुपये 52 कोटी 16 लाख कर्ज वाटप करण्यात
आले. एकूण प्रकरण संख्या 1 लाख 36 हजार 129
तर एकूण कर्ज रक्कम रुपये 449 कोटी एक लाख रक्कम बँकाद्वारे वाटप करण्यात आल्याचेही
ते म्हणाले.
त्यामध्ये एसबीआय ॲन्ड असोसिएट बँकेने 1 हजार 245
प्रकरणे, कर्ज वाटप रक्कम रुपये 36 कोटी 5 लाख, पब्लिक सेक्टर बँकेने 2 हजार 116 प्रकरणे,
कर्ज रक्कम रुपये 62 कोटी 72 लाख, प्रायव्हेट सेक्टर बँकेने 74 हजार 30 प्रकरणे ,
कर्ज रक्कम रुपये 198 कोटी 1 लाख , रिजनल रुरल बँकेने 1 हजार 279 प्रकरणे तर कर्ज
रक्कम रुपये 26 कोटी 95 लाख, एनबीएफसी-मायक्रो फायनान्स इन्स्टीस्ट्युशनने 57 हजार
459 प्रकरणे तर कर्ज रक्कम रुपये 125 कोटी 29 लाख एकूण प्रकरण संख्या 1 लाख 36
हजार 129 तर एकूण कर्ज रक्कम रुपये 449 कोटी एक लाख रक्कम वाटप केली आहे, असेही ते
म्हणाले.
या बैठकीस मुद्रा योजनेशी संबंधित विविध विषयावर सविस्तर
चर्चा करण्यात आली. योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर
करण्याबाबतही बैठकीत जिल्हाधिकारी डोंगरे यांनी निर्देश दिले. समिती सदस्यांनीही
यावेळी माहिती देवून चर्चेत सहभाग नोंदवला.
****
No comments:
Post a Comment