Tuesday, January 16, 2018

हिशोब पत्रके सादर न करणाऱ्या
संस्थांना खुलासा करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15:- संस्था स्थापना केल्यापासून ज्या संस्थांनी हिशोब पत्रके सादर केली नाहीत, त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी धर्मादाय उपआयुक्त कार्यालयामार्फत दुसरी यादी तयार करण्यात आली असून ती धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात व संकेतस्थळावर प्रकाशीत केली आहे. संबंधीत संस्थेच्या विश्वस्तांनी यादीचे निरीक्षण करुन घ्यावे. संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येऊ नये याबाबत खुलासा नेमुन दिलेल्या तालुक्याच्या दिवशी व कार्यालयातील न्याय कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा वकीलामार्फत सकाळी 11 वा. सादर करावा, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणित श्रीनीवार यांनी केले आहे.
सुनावणीच्यावेळी आपल्या सबळ पुराव्यासह आपले म्हणणे मांडण्यासाठी सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, अन्यथा आपण गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन आपली संस्था नोंदणी रद्द करण्यासंबंधीची नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...