Tuesday, January 16, 2018

जिल्हा नियोजन समितीची
लहान गटाची बैठक संपन्न
नांदेड, दि. 16 :- जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 च्या प्रारुप आराखड्याची छाननी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाची बैठक आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली            येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाली.  
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्रीमती शैलेजा स्वामी, डॉ. अशोक बेलखेडे, बबन बारसे आदी सदस्य तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.   
या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व अनुसुचित जाती उपयोजना, अनुसुचित जमाती उपयोजना प्रारुप आराखडा 2018-19 ची छाननी संदर्भात तसेच अद्ययावत 2017-18 मध्ये खर्च झालेला निधी व 2018-19 मध्ये प्रस्तावित कामे यासंदर्भात आमदार नागेश पाटील (आष्टीकर) यांनी आढावा घेतला. तसेच मागील जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या अनुषंगाने अनुपालन अहवाल सादर करण्याबाबतही जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना यावेळी श्री पाटील यांनी निर्देश दिले.
तसेच याप्रसंगी आरोग्य विभाग, वनविभाग, शालेय आरोग्य, पाणी पुरवठा, वैद्यकीय विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा , सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, नगर विकास तसेच अन्य विविध विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.  

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...