Friday, November 24, 2017

जिल्ह्यातील 760 गावात  
संभाव्य पाणी टंचाई जाहीर
             नांदेड दि. 24 :- महाराष्ट्र भुजल अधिनियम (विकास व व्यवस्थापन) 2009 चे कलम 20, 25 व 26 अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 760 गावे / वाडी / तांड्यामध्ये सद्यस्थितीत पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याने संभाव्य पाणी टंचाईग्रस्त जाहीर केले आहेत.  
            वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून नांदेड जिल्हा निरिक्षण विहिरींचा मागील 5 वर्षातील पाणी पातळीची सरासरी तुलना ऑक्टोंबर 2017 अखेर घेण्यात आली. या पाण्याच्या पातळीशी तुलना केली असता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ऑक्टोंबर 2017 ते जून 2018 या कालावधीत संभाव्य पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. एकुण 47 पाणलोट क्षेत्रापैकी 4 पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळी अत्यल्प (0 ते 1 ) आढळून आली आहे.
            जिल्ह्यातील 6 पाणलोटातील एकुण 212 गावांमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यातून पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत 11 पाणलोटातील 216 गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जुन 2018 या कालावधीत 23 पाणलोटातील एकुण 332 गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे, अशी माहिती आदेशात दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...