माझी कन्या भाग्यश्री योजनेवर
मंगळवारी विविध स्पर्धांचे आयोजन
नांदेड, दि. 27 :- महिला व बालविकास विभाग
जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयामार्फत माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजनेच्या
प्रचार व प्रसिद्धीसाठी इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या मुली व मुलांसाठी बेटी
बचाओ बेटी पढाओ (निबंध स्पर्धा), स्त्री भृण हत्या (वक्तृत्व स्पर्धा), महिला सक्षमिकरण
(घोषवाक्य स्पर्धा) या स्पर्धेचे आयोजन मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 11
वा. नांदेड जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे सभागृह येथे करण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावरील प्रथम दोन क्रमांकांना
विभागस्तरावर तर विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकांना राज्यस्तरावर सहभागाची संधी
देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील प्रथम दोन क्रमांकांना पालकमंत्री
महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तर विभागीय स्तरावरील व राज्य स्तरावरील
प्रथम क्रमांकास मुख्यमंत्री व मंत्री महिला व बाल विकास विभाग यांचे हस्ते
गौरविण्यात येणार आहे. जास्तीतजास्त मुला व मुलींनी या तिन्हीही स्पर्धेत सहभाग
नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.वि.) यांनी
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment