हमी भावाने मुग, उडीद, सोयाबीन
खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु
नांदेड, दि. 27 :- केंद्र शासनाच्या आधारभुत
किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत हमी भावाने मुग-उडीद खरेदीसाठी देगलूर,
धर्माबाद, बिलोली येथे केंद्र सुरु आहेत. तसेच सोयाबीनसाठी नांदेड, लोहा, देगलूर,
धर्माबाद, बिलोली, हदगाव, मुखेड, भोकर येथे खरेदी केंद्र सुरु आहेत. खरेदी
केंद्रावर माल विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी सोबत सात-बाराचा
उतारा, सन 2017-18 चा पिकपेऱ्याची नोंद असलेला आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बॅक
पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणावी. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल
खरेदी केंद्रावर आणण्यासाठी भ्रमणध्वनीवर संदेश मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी
आपला माल 12 टक्के पर्यंत ओलावा असलेला, काडी कचरा विरहीत, स्वच्छ, FaQ
दर्जाच्या असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा,
असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment