Thursday, June 8, 2017

मानधन योजनेसाठी जेष्ठ कलावंताची
7, 8 जुलै रोजी सादरीकरणातून निवड
नांदेड, दि. 8 :-  सांस्कृतीक कार्य संचानालयाच्यावतीने जेष्ठ व साहित्यीक कलाकार मानधन योजना राबविण्यात येते. जिल्ह्यात सन 2015-16 व सन 2016-17 या वर्षातील 120 जेष्ठ कलावंताची निवड करण्यासाठी जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात  शनिवार 7 जुलै व रविवार 8 जुलै 2017 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत प्रत्यक्ष कला सादर करुन निवड करण्यात येणार आहे.  
जेष्ठ कलावंताची निवड करण्यासाठी समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव यांचे दालनात नुकतीच बैठक घेण्यात आली. जेष्ठ कलावंतानी सादरीकरणास येते वेळेस ओळखपत्र म्हणून आधार कार्ड व कला सादरीकरणाचे साहित्य स्वत: सोबत आणावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री तांबोळी यांनी केले.
सभेस सदस्य श्रीमती सिताभाभी राममोहनराव, रत्नाकर आपस्तंभ, अरविंद देशमुख, बाळासाहेब सुर्वणकार, मधुकर कदम, श्रीरंग खानजोडे तसेच समितीचे सचिव तथा अतिमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एस. जी. वागतकर आदी उपस्थित होते.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...