Thursday, June 8, 2017

  मोसंबी उत्पादकांना
फळपीक विमा भरण्याचे आवाहन
नांदेड, दि. 8 :-  मृग बहारामधील मोसंबी  फळपिकाचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत  बुधवार 14 जुन 2017 अशी आहे. इच्छुक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत विमा हप्ता बँकेत भरावा. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मोसंबी फळपिकाखालील नांदेड तालुक्यातील लिंबगाव व विष्णुपुरी, मुदखेड तालुक्यातील मुदखेड व बारड, मुखेड तालुक्यातील मुखेड व जाहुर, धर्माबाद तालुक्यातील करखेली. हदगाव तालुक्यातील हदगाव व पिंपरखेड. कंधार तालुक्यातील बारुळ या महसुल मंडळांचा समावेश आहे. पुर्नरचीत हवामान आधारीत पिक विमा योजना सन 2017-18 च्या मृग बहाराकरीता मोसंबी या पिकासाठी एकुण विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर 70 हजार रुपये असन शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता प्रति हेक्टर 3 हजार 500 रुपये एवढा आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गत पुर्नरचीत हवामानावर योजना सन 2017-18 मध्ये राबविण्याकरीता लागु करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड जिल्हयातील मृग बहारामधील मोसंबी या फळपिकाचा यामध्ये समावेश केला आहे. ही योजना नांदेड जिल्हयातील अधिसुचीत केलेल्या महसुल मंडळात इफको टोकीओ विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...