Monday, May 1, 2017

भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीचे
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
नांदेड दि. 1 :-  जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नूतन इमारतीचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार-जवळगावकर, आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. शेलार, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, तहसिलदार किरण अंबेकर आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते फीत कापून तसेच दिप प्रज्वलाने उद्घाटन संपन्न झाले. पालकमंत्री खोतकर यांनी इमारतीतील विविध शाखांची पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत इमारत उपलब्ध झाल्याबाबत व त्यातील सोयी-सुविधांबाबत समाधानही व्यक्त केले.  जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. व्ही. एस. निकम यांनी यावेळी स्वागत केले व आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 1185 सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी ईक...