तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास
पालकमंत्री खोतकर यांची दर्शनासाठी भेट
नांदेड दि.
1 :-
येथील सुप्रसिद्ध तख्त
सचखंड श्री हुजूर
साहिब गुरुद्वारास
राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री
तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज भेट
देवून दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य
कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, उपविभागीय अधिकारी
प्रदीप कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
सचखंड गुरुद्वारा येथे भेट दिल्यानंतर पालकमंत्री खोतकर यांचा पंचप्यारे साहिबान यांच्या हस्ते शिरोपा, केसरी चोला, शाल व
गुरुद्वाराचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर संतबाबा बलविंदरसिंघजी यांची भेट घेऊन पालकमंत्री
खोतकर यांनी गुरुद्वारा सुवर्ण मुलामा देण्याच्या कामाबाबत माहिती घेतली.
सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या
कार्यालयात सचिव राजू घाडिसाज यांच्या हस्ते पालकमंत्री खोतकर यांचा
सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच गुरुद्वाराचे अधीक्षक डी.
पी. सिंघ, सहाय्यक अधीक्षक ठाणसिंघ बुंगई आदींचीही उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment