मंत्रालयात
अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओ
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा
स्वीकार करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या कार्यकक्षा उत्तमरीत्या
विस्तारल्या असून स्टुडिओमुळे महाराष्ट्रातील जनतेशी थेट संवाद साधणे शक्य झाले
आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, संचालक प्रशासन अजय अंबेकर, संचालक
वृत्त देवेंद्र भुजबळ, संचालक माध्यम समन्वय
शिवाजी मानकर यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
राज्य शासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अत्याधुनिक स्टुडिओची निर्मिती केली आहे. या
स्टुडिओमुळे सर्व सामान्य जनतेला आपले
प्रश्न शासनापुढे मांडण्यासाठी तसेच शासनाला आपले काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी
एक सशक्त असे दृकश्राव्य संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
नवीन स्टुडिओ मध्ये आत २४ व मंत्रालय गेटबाहेर
१६ कनेक्टिव्हिटी पोर्टस् उपलब्ध
करून देण्यात आले आहेत.. त्यामुळे इतर
वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅनसना इनपूट देणे शक्य होईल. जयमहाराष्ट्र – दिलखुलास हे महासंचालनालयाचे कार्यक्रम
मंत्रालयातच ध्वनीचित्रमुद्रित करणे या स्टुडिओमुळे शक्य होणार आहे. स्टुडिओत
क्रोमा, क्रु टेक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला
आहे.
माहिती जनसंपर्ककडून नावीन्यपूर्ण उपक्रमांची
अंमलबजावणी
“मी
मुख्यमंत्री बोलतोय”या
कार्यक्रमातून जनतेशी साधल्या जाणाऱ्या संवादासाठी राज्यभरातून भरघोस प्रतिसाद
मिळाला. केवळ चार दिवसात १८ हजार प्रश्न
व्हॉटसॅपवर तसेच १२५० प्रश्न ईमेल वर प्राप्त झाले असल्याचेही श्री. सिंह यांनी
यावेळी सांगितले.
महासंचालक
श्री. ब्रिजेश सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना
“मी
मुख्यमंत्री बोलतोय”या
कार्यक्रमाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या चौफेर कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी चित्रफीत ही दाखवण्यात आली.
००००
No comments:
Post a Comment