निकाली,
5 कोटी, 20 लाखांवर तडजोड
लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनल वरील न्यायाधीश, वकील सदस्य, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.
नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद एकताटे, उपाध्यक्ष अॅड जगजीन भेदे, जिल्हा सरकारी वकील अॅड अमरिकसिंघ वासरीकर, सचिव अॅड एन. एल. कागणे, जिल्हयातील विधिज्ञ, विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसूल विभाग अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनीही उपस्थित पक्षकार तसेच न्यायाधीश, विधिज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रबंधक पी. एस. तुप्तेवार व सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
000000
No comments:
Post a Comment