दहावी,
बारावीतील खेळाडुंना
गुणासाठी
प्रस्ताव देण्याचे आवाहन
नांदेड
दि. 27 :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12
वी मधील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुंना
क्रीडा सवलतीचे वाढीव 25 गुण देण्यासंदर्भात शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन
2016-17 या शैक्षणिक वर्षात क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे मार्फत आयोजित
राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त किंवा सहभाग
नोंदविलेल्या खेळाडुंना सवलतीचे गुण देण्यात येतात. याकरीता विहित नमुन्यातील अर्ज
प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आपले परिपूर्ण प्रस्ताव क्रीडा
प्राध्यापक व शारीरिक शिक्षक यांच्यामार्फत शुक्रवार 10 मार्च 2017 पर्यंत
कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत.
जिल्हा
क्रीडा अधिकारी नांदेड यांची प्रतीस्वाक्षरी घेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व
उच्च माध्यमिक मंडळ लातूर विभाग लातूर येथे सादर करावेत. तसेच हे प्रस्ताव
पालकांमार्फत स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच विहित मुदतीत प्राप्त
न झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
तसेच सन
2016-17 या शैक्षणिक वर्षात मान्यता प्राप्त विविध खेळ संघटना मार्फत आयोजित
केलेल्या राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त किंवा
सहभाग झालेल्या खेळाडुंचे अर्जासोबत शासन निर्णय 21 एप्रिल 2015 अन्वये जिल्हा,
विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्त
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत यादी प्राप्त
झाल्यानंतरच प्रस्ताव स्विकारले जातील. याबाबत खेळ निहाय प्राप्त यादीची प्रत
नोटीस बोर्डवर लावण्यात येईल, त्यानंतर अर्ज सादर करावेत. क्रीडा सवलतीचे गुण
मिळण्यापुर्वी नांदेड जिल्ह्यातील क्रीडा संघटनेनी शासन निर्णय 21 एप्रिल 2015
मधील परिशिष्ट अ मधील नियम व अटीच्या नुसार संघटनेचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय नांदेड येथे बुधवार 15 मार्च 2017 पुर्वी सादर करावेत. शासन निर्णयातील
15 अटीचे पालन न झाल्यास कोणत्याही संघटनेच्या खेळाडूस सवलतीचे गुण मिळणेबाबतच्या
प्रस्तावाची शिफारस करण्यात येणार नाही. तसेच प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी
सुद्धा खेळाडुंनी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचे
प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे
खेळाडुच्या ग्रेस गुणचे प्रस्ताव शिफारस करावे.
जिल्ह्यातील सर्व शाळा,
महाविद्यालयातली मुले-मुली खेळाडुंनी सवलतीचे गुण मिळण्याकरीता विहित मुदतीत
कार्यालयीन वेळेत आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल
यादवे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment