Monday, February 27, 2017

वाढत्या तपमानामुळे उष्णतेपासून
स्वतःचे संरक्षण करा
आरोग्य विभागाचे आवाहन
            नांदेड दि. 27 :-  वाढत्या उन्हाबरोबरच तपमानात वाढ होऊ लागली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांनी उन्हापासून  स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळ्यात नांदेड शहरातील तापमान उच्चांक गाठतो. अनेकदा उष्णतेची लाट येते. अशा वेळी नागरिकांनी विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तिनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास भरपूर थंडगार पाणी पिणे, भरपूर इतर थंड पेय पिणे ( उदा. ताक, आंब्याचे पन्ह, नारळ-पाणी ), अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जायचे टाळणे जात असल्यास टोपी घालावी किंवा डोक्याला दुपट्टा बांधावा. सैल व फिकट रंगाचे सुती कपडे घालणे. थंड जागेत, वातावरणात राहणे. साधारणतः दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भर उन्हात काम करायचे टाळणे आवश्यक असल्यास सावलीत काम करावे.
उष्माघाताची लक्षणे पुढील प्रमाणे आहे. अस्वस्थपणा , थकवा , शरीर तापणे , अशक्तपणा , अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ. उष्माघाताची लक्षणे आढळ्यास नागरिकांनी थंडगार पाण्याने अंघोळ करणे. थंड जागेत, वातावरणात आराम करणे. परीश्रमाची कामे न करणे. भरपूर थंड पाणी / पेय पिणे.  मनपा आरोग्य केंद्रात, दवाखान्यात, वैद्यकीय महाविद्यालयात त्वरित औषधोपचार करवून घेणे. 108 या निशुल्क (टोल फ्री) दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आकस्मित आरोग्य सेवेचा लाभ घ्या , असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...