अल्पसंख्याकांच्या शिष्यवृत्ती अर्जांबाबत
महाविद्यालयांना शिक्षण सहसंचालकांचे आवाहन
नांदेड, दि. 27 – अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्तींबाबत महाविद्यालयाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ
महाविद्यालयाचा, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांनी युजर आयडी व पासवर्ड
प्राप्त झालेले नसल्यास ते लवकरात लवकर
प्राप्त करून घेऊन, शिष्यवृत्ती अर्जांना मंजूरी देण्याची प्रक्रिया पुर्ण
करावी, असे आवाहन शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग यांनी केले आहे.
याबाबतच्या
निवेदनात म्हटले आहे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत नांदेड,
लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानीत
व कायम विनाअनुदानीत कनिष्ठ, वरिष्ठ, डी.एड. बी.एड. , औद्योगिक प्रशिक्षण संस्था
तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयात सन 2016-17 मध्ये नियमित प्रवेश
घेतलेले मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन व ज्यू या अल्पसंख्याक
समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती नवीन व नुतनीकरण
शिष्यवृत्ती योजना सन 2016-17 साठी राबविण्यात येत आहे.
तथापि अजूनही
बऱ्याच महाविद्यालयातील नवीन व नुतनीकरणाचे ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज
प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या लॉगीन आयडीवर प्रलंबित असून सदरील अर्ज पुढील
मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच ज्या महाविद्यालयांना
आपल्या महाविद्यालयाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ
महाविद्यालयाचा, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थेचा युजर आयडी व पासवर्ड प्राप्त
झालेले नसेल ते लवकरात लवकर शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड या कार्यालयाकडून
प्राप्त करुन घेऊन प्रलंबित ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जास मंजुरी देण्यात यावी.
जेणेकरुन या शिष्यवृत्ती योजनेपासून अल्पसंख्याक समाजातील एकही विद्यार्थी वंचित
राहणार नाही, असे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक
डॉ. मोहन खताळ यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment