मराठी
भाषा गौरव दिनानिमित्त
सोमवारी व्याख्यान, ग्रंथप्रदर्शन
ग्रंथालय अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन
नांदेड
दि. 25 :- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी
कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी मराठी
भाषा गौरव दिन म्हणून
साजरा करण्यात येतो. यानिमित्त
सोमवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वा. जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड
व
जिल्हा महिती कार्यालय यांचे
संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालय येथे व्याख्यान व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
“संगणक
व महाजालावरील मराठी”
या विषयावर स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र
संकुलाचे सहयोगी प्रा. डॉ. महेश जोशी यांचे व्याख्यान
होणार असून यशवंत महाविद्यालयाचे मराठी
विभागाचे प्रा.डॉ.शंकर विभूते
हे अध्यक्षस्थानी राहतील.
याप्रसंगी कुसुमाग्रज
यांचे व मराठी भाषेतील
नावाजलेली ग्रंथ यांचे प्रदर्शन
सुध्दा भरविण्यात येणार आहे. रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित
राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय
अधिकारी सुनील हुसे तसेच जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment