मतदार
जागृतीसाठी
विविध
कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड, दि. 16 :- फेब्रुवारी महिन्यात होऊ
घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर निवडणूक
विभागातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत व मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे.
मतदारांनी स्वयंस्फुर्त,
निर्भयपणे मतदान करावे तसेच मोठ्या संख्येने मतदानासाठी समोर यावेत यासाठी 16 ते
20 जानेवारी 2017 दरम्यान मतदान यंत्र इलेक्ट्रॉनिक ओटींग मशीन्स ( ईव्हीएम) ची
माहिती, शालेय परिसंवाद कार्यक्रम, मतदानासाठी प्ररित करण्यासाठी गेट-सेट-वोट हा
कार्यक्रम होणार आहे. तसेच मतदान केल्यामुळे आपण सक्षम लोकशाही निर्माण करु शकतो
या संदर्भात लघुपटही विविध महाविद्यालयातून दाखविण्यात येणार आहे.
ज्या मतदारांचे नाव दोन
ठिकाणी आहे अशा मतदारांनी स्वत:हून आपले एका ठिकाणचे नाव वगळावे व “मी सजग मतदार” या
अभियानांतर्गत महानगरपालिका व पंचायत समिती यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शनिवार 21 जानेवारी रोजी
महिला मतदारांसाठी विवेक ज्योती सखी सहेली मेळाव्याचे आयोजन तहसील कार्यालय नांदेड
येथे करण्यात आले आहे. तत्पूर्वी दिनांक 20 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षापुढील
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शिबीर बचत भवन नांदेड येथे आयोजित करण्यात
आले आहे. रविवार 22 जानेवारी 2017 रोजी “सक्षम करुया युवा व भावी मतदार” या विषयावर
खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शब्द मर्यादा एक हजार
शब्दाची असेल.
सोमवार 23 जानेवारी रोजी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा महोत्सवाचे आयोजन सहयोग कॅम्पस विष्णुपुरी
येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध महाविद्यालयाचे संघ, गीत, नाटय, घोषवाक्य
आदींच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश देणार आहेत. यासाठी संघांना
सादरीकरणासाठी प्रत्येकी 15 मिनिटाचा वेळ असेल. विजेत्या संघांना बक्षिसेही
देण्यात येणार आहेत.
मतदार जागृती
अभियानांतर्गत सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी,
नांदेड तहसिलदार प्रदिपसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाने केले
आहे.
000000
No comments:
Post a Comment