शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मकरसंक्रांत,
भुगोल दिन साजरा
नांदेड दि. 16 :-
मकरसंक्रांत, भूगोल
दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोपीय कार्यक्रम एकत्रितपणे शासकीय अध्यापक
महाविद्यालय नांदेड येथे आज संपन्न
झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या उच्च
शिक्षण विभागाचे संचालक
डॉ. धनराज माने, सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. माने यांनी शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन
करताना मराठी भाषा व मातृभाषेचे महत्व विशद केले. आपल्या भाषिक संस्कृतीचा आढावा घेत
ग्रामीण भागातील प्रत्येक आई ही सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीत संक्रमित करीत
होती, असे सांगून शिक्षणात मातृभाषेला महत्व देवून सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे
असे नमूद केले. कार्यक्रमात
बीएड व एमएड प्रशिक्षणार्थ्यांनी
मकरसंक्रांतीचे व भुगोल
दिनाचे महत्व विशद केले. प्रा. डॉ. बेलोकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे
संयोजन प्रा. सोळुके व डॉ. बेलोकर यांनी केले.
0000000
No comments:
Post a Comment