Friday, October 14, 2016

राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रिडा स्पर्धा
नांदेडमध्ये 4 नोव्हेंबर पासून ; नियोजन सुरु  
नांदेड, दि. 14 :-  राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रिडा स्पर्धा 2016-17 चे यजमान पद नांदेड जिल्ह्यास मिळाले आहे. सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या गटातील या स्पर्धा 4 ते 6 नोव्हेंबर 2016 या कालावधीत खालसा हायस्कूल मैदानावर होणार आहेत. या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या आयोजनासाठी नेटके नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टिने आढावा बैठक आज श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस महाराष्ट्र राज्य क्रिडा परिषदेचे सदस्य लड्डुसिंग महाजन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रामलू पारे, मैदान व्यवस्थापक प्रा. डॉ. बळीराम लाड, दृष्ट दमन शिरोमणी क्रिडा युवक मंडळाचे सचिव हरविंदरसिंघ कपूर , खालसा हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. चांदसिंघ, हॉकी संघटनेचे गुरमीत सिंघ, अवतारसिंघ रामगडीया, क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक डी. पी. सिंघ आदींची उपस्थिती होती.
 स्पर्धेचे उद्घाटन 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वा. होणार आहे. स्पर्धेत राज्यातील 18 संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 9 संघ मुलांचे तर 9 संघ मुलींचे असतील. स्पर्धेसाठी खालसा हायस्कूल मैदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या मैदानावरील सुविधांबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देश दिले. हॉकीसाठी मैदान सुसज्ज करणे, परिसरातील स्वच्छतेसाठी व्यवस्था करणे याबाबत सार्वजनिक बांधकाम व महापालिकेच्या यंत्रणेशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्पर्धेसाठी येणाऱ्या शालेय खेळाडुंची गैरसोय होवू नये. त्यांच्या निवास, व भोजनाची सुनियोजितपणे व्यवस्था व्हावी याबाबत चर्चा करण्यात आली. निवास व भोजनाची जबाबदारी गुरुद्वारा बोर्डाने घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ तसेच क्रिडा संघटना, हॉकी प्रेमी यांना निमंत्रीत करण्यात यावे , असेही निर्देशीत करण्यात आले.

                                                                     000000       

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...