Thursday, September 8, 2016

प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) प्राधान्यक्रम यादी
ग्रामसभेद्वारेच अंतिम होणार  - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

नांदेड, दि. 8 :- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी तयार करावयाच्या प्राधान्यक्रम याद्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधितांना जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. योजनेची यादी तयार करण्यासाठी काल्पनिक असा विहित अर्ज तयार करुन तो लाभार्थी निहाय ग्रामपंचायतस्तरावर भरुन घेतला जात आहे. हे अर्ज चुकीचे असून या प्रक्रियेवर कुणीही अवलंबून राहू नये. यातून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची आर्थिक पिळवणूक होऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. असे विहित अर्ज शासनाकडून भरुन घेण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. ग्रामसभेद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ची प्राधान्यक्रम यादी तयार होणार आहे. याबाबत संबंधिताने नोंद घ्यावी, असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांनी केले आहे.
केंद्र शासनाने ग्रामीण भागातील बेघर कुटूंब लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल देण्यासाठी सन 2016-17 यावर्षापासून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही राबविण्यात येणार आहे. या घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी योजनेसाठी पात्र कुटुंबांची ग्रामपंचायत प्रवर्गनिहाय याद्या पडताळणी करुन ग्रामसभेद्वारे अंतिम करण्यात येत आहे.
या योजनेचा ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना लाभ देण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण-2011 ची माहिती उपलब्ध आहे. या माहितीचा वापर करुन प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेसाठी लाभार्थी निवडीची प्राधान्यक्रम याद्या ग्रामपंचायतनिहाय ग्रामसभा आयोजित करुन तयार करण्याचे पुढीलप्रमाणे निर्देश संबंधित ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) चे ग्रामपंचायत निहाय प्राधान्यक्रम याद्या तयार करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी किंवा त्यादरम्यान ग्रामसभेचे आयोजन करणे. ग्रामसभेपुढे योजनेच्या अनुषंगाने पुढील विषयाचा समावेश राहणार आहे.  
प्रत्येक ग्रामपंचातीकडे प्राप्त प्राधान्यक्रम यादीतून इतर संवर्गातून अल्पसंख्यांक संवर्गातील जैन, बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारशी मुस्लिम कुटुंबांची स्वतंत्र प्रपत्र- मध्ये यादी मुळ प्राधान्यक्रम यादीतील प्राधान्यक्रम अबाधित ठेवून तयार करावयाचे आहे. ग्रामपंचायतीकडे जेवढे प्राधान्यक्रम यादी प्राप्त झाली आहे. त्या यादीतील अपात्र लाभार्थीची नावे वगळुन, कमी करुन प्रपत्र- मध्ये (अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्यांक इतर) प्रवर्गाची प्रवर्गनिहाय यादी तयार करणे.प्रत्येक ग्रामपंचायतीकडे जेवढी प्राधान्यक्रम यादी प्राप्त झालेली आहे. या यादीतील ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेचा लाभ देणेसाठी विविध कारणाने कमी करावयाचे आहे, वगळावयाचे आहे जसे यादीत चुकीने समाविष्ठ, यापुर्वी लाभ, मयत, पक्के घर, स्थलांतरीत अशा इतर कारणानी  अशा लाभार्थीची प्रवर्गनिहाय नावे प्रपत्र-क मध्ये घ्यावयाची आहेत. संबंधित ग्रामपंचायतींकडे प्राप्त प्राधान्यक्रम यादीमध्ये समावेश नसलेल्या परंतु प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) करीता योजनेचा लाभ देणेसाठी पात्र ठरणाऱ्या ग्रामसभेनी सुचविलेल्या नवीन कुटुंबांची लाभार्थी निहाय संवर्गनिहाय स्वतंत्र अशी यादी (अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्यांक इतर) प्रपत्र- मध्ये  तयार  करुन  मान्यता  घेऊन  सादर  करावयाची आहे.
याप्रमाणे प्रक्रिया पुर्ण करुन ग्रामसभा ठरावाद्वारे संवर्गनिहाय याद्या संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती तथा अध्यक्ष तालुकास्तरीय समिती यांच्याकडे सादर करावयाचे आहे. संबंधित ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठीच्या याद्या तातडीने सादर करण्याबाबत जिल्हास्तरावरुन पाठपुरावा करण्यात येणार आहे.  

000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...