Thursday, September 8, 2016

लेख

महिला सक्षमीकरणाला
बचत गटाच्या माध्यमातून आधार
       नांदेड जिल्हा उपक्रमशील जिल्हा म्हणुन ओळखा जातो. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्ह्या विविध योजना यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यात विशेष करुन महिला सक्षमीकरण हा त्यांच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. शहरात सर्वच धर्माच्या-जातीच्या महिला या बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करतात. तशी शहरात मुस्लीम समाजाची लोकसंख्या मोठी असून या समाजातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नवी दिशा देण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसून येत आहेत.
नांदेड शहरात महिला सबलीकरणासाठी अनेक योजना उपक्रम राबविणे सुरु आहे. त्याअनुषंगाने  मुस्लीम समाजातील महिलांना त्यांच्या मधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि बचत गटातून त्यांचे जीवन सुखकर व्हावे हे प्रयत्न करण्यासाठी सावित्रीबाई महिला बचत गटाच्या  विमलताई यांनी मुस्लीम महिलांना प्रोत्साहन दिले त्यामुळे या महिला शासनाच्या विविध विकास विषयक योजना समजावून घेत आहेत. त्याचेच एक उदाहरण देगलूर नाका भागातील आयशा बेगम या होतकरु कष्टाळू महिलेने चाँद बीबी महिला बचत गटाची स्थापना केली.
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी या महिलांना दैनदिन जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी केवळ पतीच्या रोजंदारीकडे पहावे लागते. दिवसभर काम केले तरच घर चालत असे. पतीने दिले तरच संसाराचा गाडा चालविणे अशा एकतर्फी जीवन पध्दतीला फाटा देत स्ववबळावर स्वत:तील कर्तृत्वावर उभे राहण्याचा मुलमंत्र बचत गटातून या महिलांना मिळाला आहे. परिसरातील अशिक्षीत शिक्षित महिलांनी एकत्र करून चाँदबीबी  महिला बचत गटात सहभागी करून घेतले आहे. दैनंदिन गरजा भागवून थोडी बचत करून त्यांना बचत गटाचे सभासद बनविले. आयेशा बी यांनी मोठ्‌या धाडसाने प्रयत्न केला 10 आणि नंतर 20 महिलांचा गट बनविला. घरकाम करणाऱ्या महिलांकडून थोडे-थोडे पैसे गटात भरले. सुरुवातीला 3 हजार रूपये भांडवल एकत्र केले. याच भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जमा केले. काही दिवसात आम्हाला 30 हजार रूपये कर्ज मिळाले. त्यातून आम्ही कापड उद्योग करण्यासाठी लागणाऱ्या साडया, कापड, ड्रेस, असे थोडे-थोडे भांडवल वाढवले. बचत गटाची धडपड पाहून सर्व महिलांचा प्रामाणिक प्रयत्न पाहून काही दिवसात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी यांनी दुकानाची पाहणी करुन पुन्हा कर्जाच्या रक्कमेत वाढ करुन 60 हजार रुपये कर्ज दिले , असे आयेशा बेगम सांगतात.  
कर्जाच्या रक्कमेत बचत गटाने दोन शिलाई मशीन, साडी वर्क, मशीन काही कापड, साडया खरेदी केल्या.आयेशा बेगम या कर्तृत्ववान महिलेच्या पुढाकाराने बचत गटातील 20 महिला सक्रिय झाल्या. नियमित बचत करणे, बचत गटाला वाढविणे आणि त्यांचा लाभ घेणे सुरु झाले. 6 वर्षापुर्वि केलेल्या या उपक्रमामुळे आज अनेक महिलांना बचत गटातून मिळणाऱ्या अल्प व्याज दरातून स्वत:चे छोटे उद्योग करण्याची संधी मिळाली. आज या गटामुळे 6 वर्षात त्यांच्या उत्पन्नात बऱ्यांपैकी वाढ झाली. आता महिलांचे पतीही त्यांना सहकार्य करत आहेत. आज या महिलांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण देणे शक्य झाले आहे. बचत गटाची कार्यक्षमता ओळखून पुढे बँकेने आणखी  दिड लाख रुपये कर्ज दिले आहे.
त्यामुळे बचत गटाला बळ मिळाले प्रत्येक महिला स्वत:च्या पायावर उभी राहिली महिलांच्या या प्रयत्नांना बँक अधिकाऱ्यांनी चांगली दाद दिली.
बचत गटाचे महत्व बँकेचे सहकार्य करण्यात येणारा उद्योग, परतफेड, बचत गटाचा हिशोब आणि तयार केलेल्या मालाच्या विक्री या विषयीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. या प्रशिक्षणातून त्यांच्या उद्योगाला एक नवी दिशा मिळाली. उत्पन्नाचे नियमित साधन उपलब्ध झाल्याने, पैसे मिळु लागले आणि जगण्याला आधार मिळाला.

                                                                                                  - नागोराव हरीभाऊ  अटकोरे

  (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...