जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 13
:- जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडून नुकतेच जिल्हा कारागृह नांदेड येथे जिल्हा विधी
सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर.
कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख
पाहुणे म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. एस. एन. सचदेव, सह दिवाणी न्यायाधीश एम.
के. सोरते, अॅड. इद्रिस कादरी, अॅड. मो., अॅड. बाळासाहेब नरवाडे व अॅड. ए. वाय. चंदनशिवे हे उपस्थित
होते.
न्या. सचदेव यांनी
बंद्यांना जामिनावर सुटण्याचा हक्क याविषयी माहिती देतांना पॅरोल बेलवर
सुटण्यासाठी कारागृहातील आपली वागणुक महत्वाची असते असे सांगून त्यांनी याबाबत
माहिती देतांना महाभारतातील कर्ण-दुर्योधन यांचे उदाहरण देवून विस्तृत माहिती
दिली.
न्या. कुरेशी यांनी उपस्थित बंद्यांना
मार्गदर्शन करतांना समाजामध्ये वावरताना आपल्या हातून कुठलेही वाईट कृत्य होणार
नाही याची काळजी घ्या. संयम बाळगा असे सांगीतले. न्या. एम. के. सोरते यांनी प्ली
बारगेनिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. इद्रिस कादरी यांनी कैद्यांचे
विविध अधिकार याबाबत माहिती दिली. अॅड. बाळासाहेब नरवाडे यांनी जामिनाबाबत
असलेल्या तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली. अॅड. चंदनशिवे यांनी सुध्दा बंदी व
न्यायधीन बंदी यांचे अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. मो. शाहेद मो.
इब्राहिम यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक. जी.
के. राठोड यांनी आभार मानले. यावेळी कारागृहातील जवळपास 320 पुरूष व महिला बंदी
उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment