अल्पसंख्यांक
समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या
केंद्र
शासन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 11 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाअंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय
अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानीत कनिष्ठ, वरिष्ठ, डीएड, बीएड
व्यावसायिक अव्यावसायिक महाविद्यालयात सन 2016-17 मध्ये नियमीत प्रवेश घेतलेले
मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन
पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना या विभागाअंतर्गत सन 2016-17 साठी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत
आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती व नुतनीकरण शिष्यवृत्ती करण्यासाठी
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी पुढील
विवरणपत्रात केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. नवीन
शिष्यवृत्ती, नुतनीकरणासाठी इयत्ता अकरावी , बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक बुधवार 31 ऑगस्ट 2016 असून पदवी, पदवीत्तर, आयटीआय,
डिप्लोमा, बीएड, एमफील, पीएचडी यासारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक सोमवार 31 ऑक्टोंबर 2016 आहे.
विद्यार्थ्यांने व
महाविद्यालयाने अधीक माहितीसाठी तसेच नवीन प्राप्त होणाऱ्या सूचनांसाठी www.scholarship.go.in व www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर अवलोकन
करावे, असे आवाहन विभागीय सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment