ग्रामपंचायत
निवडणुकीच्या अनुषंगाने
दारु
विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 22
:- जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायीच्या
सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होत
आहे व शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी मतमोजणी होत आहे. या मतदान व मतमोजणीसाठी संबंधीत ग्रामपंचायत हद्दीतील गावात दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील किनवट, माहूर, भोकर,
हदगाव, नांदेड, मुखेड व उमरी या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच
पोटनिवडणुकीसाठी मतदान व मतमोजणी होणार आहे. त्यासाठी मतदानाचा अगोदरचा दिवस
मंगळवार 23 ऑगस्ट 2016 रोजी पूर्ण दिवस, मतदानाचा दिवस 24 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस
आणि मतमोजणीचा दिवस शुक्रवार 26 ऑगस्ट 2016 रोजी मतमोजणी पूर्ण होई पर्यंत दारु
विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मतदानाची
प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी. तसेच शांतता व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता
मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश
दिले आहेत. या आदेशानुसार परिसरातील सर्व सीएल-3, एफएल-2
एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल/बिआर-2
व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या अंतर्गत मद्य विक्रीस पूर्णपणे
बंद ठेवण्याचा आदेश आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द
दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले
आहे.
000000000
No comments:
Post a Comment