गणेशोत्सव मंडळांनी
परवानगी घेवूनच
वर्गणी गोळा करावी -
धर्मादाय उपआयुक्त
नांदेड,
दि. 22 – गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना मंडळानी परवानगी
घेणे आवश्यक आहे. तसेच त्याबाबत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करणे
आवश्यक असल्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड यांनी कळवले आहे.
धर्मादाय
उपआयुक्त कार्यालय नांदेड यांच्यामार्फत सोमवार 22 ऑगस्ट 2016 ते शनिवार 3
सप्टेंबर 2016 या कालावधीत रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून गणेश चतुर्थीसाठी
कार्यालयीन वेळेत परवाना देण्याचे काम चालू करण्यात आले आहे.
परवाना
मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे राहतील. विहित नमुन्यातील अर्ज व
अर्जावर 10 रुपये कोर्ट फी स्टॅम्प, जागा मालकाचे संमतीपत्र, पोलीस स्टेशन नाहरकत,
ठराव, गेल्यावर्षीचा जमा खर्च हिशेब पावत्यासह, मंडळातील सर्व सदस्यांचे छायांकित
ओळखपत्र, नवीन मंडळ असल्यास नगरसेवक, सरपंच यांचे नाहरकत प्रमाणपत्र ही कागदपत्रे
जोडावीत. गणेश मंडळांनी परवानगी घेवून वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उप
आयुक्त प्रणिता श्रीनिवार यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment