Monday, November 10, 2025

 वृत्त क्रमांक 1182

निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगणे व वाहून नेण्यावर निर्बंध

नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. त्यादिवशीपासून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात आचार संहिता लागू झाली आहे. 

या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 22 (1)  (ख) नुसार आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणारे अधिकारी व कर्मचारी तसेच बँकेचे सुरक्षा गार्ड यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारकास परवान्यातील शस्त्रास्त्रे बाळगण्यास व वाहून नेण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. 

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगांव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा या नगरपरिषदा व हिमायतनगर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात तसेच संपूर्ण जिल्ह्यात हा आदेश निर्गमित झाल्यापासून ते 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...