वृत्त क्रमांक 1181
शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची विरुपता करण्यास निर्बंध
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार जिल्ह्यात देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा या 12 नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. हा आदेश सदर नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
0000
No comments:
Post a Comment