वृत्त क्रमांक 797
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हा ग्रंथालय कार्यालयात अभिवादन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
नांदेड दि. 1 ऑगस्ट :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन यावेळी करण्यात आले. त्याचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी झाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कैलाशचंद्र गायकवाड, अजय वट्टमवार, उत्तम घोरपडे, निर्मलकुमार सुर्यवंशी, संजय पाटील, शिवाजी हंबिरे, रघु तसेच मोठया सख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. शेवटी कैलाशचंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.
00000


No comments:
Post a Comment