वृत्त क्र. 771
श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिन साजरा
नांदेड दि. 27 जुलै:- भारताच्या इतिहासात अनेक वेळा परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. तथापि भारतीय स्वराष्ट्राच्या संकल्पनेला विसरले नाहीत. अनेक योध्दे, क्रांतीकारकांनी एक राष्ट्र या संकल्पनेसाठी लढा दिला. 1999 मध्ये झालेल्या कारगील युध्दामध्ये भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केलेला आहे. 26 जुलै हा विजय दिन केवळ एक दिवस नसून तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे. हा विजय दिवस साजरा करून राष्ट्र भक्तीचा संकल्प पुन्हा जागविण्यासाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.
त्या अनुषंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे 26 जुलै रोजी विजय दिन साजरा करण्यात आला. विजय दिनानिमीत्त माजी सुभेदार गोविंद शेवाळकर, लक्ष्मण विश्वास, सखाराम जोशी तसेच विरांगणा श्रीमती सरोजनी शिनगार पुतळे, श्रीमती शितल कदम यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते उभेदळ पी. बी. शि. नि. यांनी आपल्या भाषणात ऐतिहासीक काळात राजे महाराजांनी लढलेल्या लढाया त्यांचे शौर्य तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणेसाठी ज्या वीर योध्यांनी प्राणांची आहुती दिली या सर्वांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमादरम्यान भारताने लढलेल्या आजपर्यंतच्या लढाया याबाबतची चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच भारताने आज केलेली शस्त्रांमधील प्रगती त्यांची ओळख चित्रफितीच्या माध्यमाव्दारे प्रशिक्षणार्थ्यांना दाखवण्यात आली. कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले माजी सुभेदार सखाराम जोशी यांनी आपले युध्दातील अनुभव कथन केले. उदयोग निरीक्षक तथा माजी सैन्य अधिकारी सतीश चव्हाण यांनी आपल्या भाषणात प्रत्येक नागरीक हा सैनिक आहे फक्त भावना जागृत व्हायला पाहिजे तसेच सैनिक हा एक विचार आहे, प्रत्येकाने जबाबदारी योग्य पध्दतीने /सदसदविवेक बुध्दीने निभावणे म्हणजे सैनिक होय असे आपल्या भाषणात नमूद केले. Submarine life चे आयुष्य कशाप्रकारचे असते यावर प्रकाश टाकला. प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. चे कार्यक्रमाधिकारी पोतदार डी. ए. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
00000
No comments:
Post a Comment