Thursday, June 26, 2025

 वृत्त क्र. 664

 दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्काराकरीता

 १५ जुलै पर्यत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 26 जून :- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2025 या वर्षासाठी पुरस्कारासाठी ऑनलाइन नामाकंन व अर्ज मागविण्यात आले आहेत. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग क्षेत्रातील संस्थांनी १५ जुलै २०२५ पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहेत.

 

अर्ज, नामांकन www.awards.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावे. राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी अर्ज नामांकने सादर करण्याच्या दृष्टीने 15 जुलै 2025 या कालावधीसाठी संकेतस्थळ सुरु राहील. राष्ट्रीय पुरस्कार सन 2025 साठी अर्ज, नामांकन केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL www.awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन सादर करावेत. उक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्यालयाच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष  व सविस्तर तपशील www.depwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येतील.

 

तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी संकेतस्थळावर माहिती भरुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   876   नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल :  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन   नुकसानीचे तात्काळ प...