Thursday, June 26, 2025

 वृत्त क्र. 665

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

30 जून पर्यंत विमा योजनेत भाग घेण्याची मुदत


नांदेडदि. 26 जून :- पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025-26 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना चिकूपेरुमोसंबीलिंबू व सिताफळ या अधिसुचित पिकांकरीता अधिसुचित महसूल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड स्टॉक एक्चेंच टॉवर्स 20 वा मजला दलाल स्टिट्र फोर्ट मुंबई 400023 यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार 2025 मधील पेरुद्राक्षसंत्रालिंबू या पिकांना भाग घेण्याची अंतिम मुदतवाढ 30 जून 2025 पर्यंत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असुन संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी उपकृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

 

पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहार मध्ये राबविण्यात येते. मृग बहार मध्ये पेरूद्राक्षसंत्रा लिंबू या पिकांसाठी भाग घेण्याची यापूर्वी अंतिम 14 जून होती. विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in हे दिनांक 13 जून रोजी सुरु झाले. त्यामुळे पीकांची भाग घेण्याची अत्यंत अल्पकालावधी मिळाला. त्यामुळे हा कालावधी वाढविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली असून आता या चार फळ पिकांसाठी विमा योजनात भाग घेण्याची अंतिम मुदत 30 जून 2025 अशी राहील.

 

नांदेड जिल्ह्यातील पुढील प्रमाणे अधिसूचित महसूल मंडळातील फळं पिक उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन फळ पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा.

 

फळपिक मोसंबीसाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 1 लाखशेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 5 हजार असून याप्रमाणे लिंबू संरक्षित रक्कम 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी 4 हजार रुपयेसिताफळ संरक्षित रक्कम 70 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी 3 हजार 500चिकु संरक्षित रक्कम 70 हजार शेतकऱ्यांनी 4 हजार 900पेरु संरक्षित रक्कम 70 हजार तर शेतकऱ्यांना 3 हजार 500 रुपये विमा हप्ता रक्कम भरावयाचा आहे.

योजना अंमलबजावणी वेळापत्रक व अधिसुचित मंडळे

ही योजना जिल्ह्यामध्ये पुढे दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठीअधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. मोसंबी फळपिकासाठी कंधार तालुक्यात बारुळकंधारफुलवळउस्माननगर अधिसुचित महसूल मंडळातधर्माबाद तालुक्यातील करखेली मंडळातनांदेड तालुक्यातील लिंबगावविष्णुपुरीनाळेश्वरतरोडा बु मंडळातमुखेड तालुक्यात मुखेडजाहुर मंडळातमुदखेड तालुक्यात मुदखेडबारड मंडळातहदगाव तालुक्यात हदगावपिंपरखेडमनाठा मंडळातअर्धापूर तालुक्यात मालेगाव मंडळात या अधिसुचित मंडळात पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. विमा संरक्षण प्रकार कमी पाऊस 1 ते 31 जुलै विमा संरक्षण कालावधी तर पावसाचा खंड यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 ते 31 ऑगस्ट राहील.

 

लिंबु फळ पिकासाठी उमरी तालुक्यात उमरी तर नांदेड तालुक्यात लिंबगावनाळेश्वर मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून कमी पाऊस 15 जुन ते 15 जुलैपावसाचा खंड 16 जुलै ते 15 ऑगस्ट राहील. सिताफळ पिकासाठी कंधार तालुक्यातील बारुळकंधारदिग्रस बु. मंडळातहदगाव तालुक्यात तामसामनाठाआष्टीपिंपरखेड तर भोकर तालुक्यात भोकर मंडळात विमा भरण्याची मुदत 31 जुलै असून पावसाचा खंड 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरजास्त पाऊस 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर विमा संरक्षण कालावधी राहील. चिकु पिकासाठी नांदेड तालुक्यातील लिंबगावतरोडा बुनाळेश्वर मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून विमा संरक्षण प्रकार जादा आर्द्रता व जास्त पाऊस विमा संरक्षण कालवधी 1 जुलै ते 30 सप्टेंबर राहील. 

पेरु फळ पिकासाठी नांदेड तालुक्यात विष्णुपुरीलिंबगावनाळेश्वर मंडळातकंधार तालुक्यातील उस्माननगरबारुळलोहा तालुक्यात सोनखेडशेवडी मंडळातमुखेड तालुक्यातील जाहूरअंबुलगा बु. चांडोळीयेवती मंडळातहदगाव तालुक्यात तामसाआष्टीपिंपरखेड मंडळातभोकर तालुक्यातील मोघाळीभोसी मंडळात तर देगलूर तालुक्यात देगलूरखानापूरमाळेगावनरंगल बु मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून विमा संरक्षण प्रकार कमी पाऊस 15 जून ते 14 जुलै राहील तर पावसाचा खंड व जास्त तापमान यासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट यानुसार विमा संरक्षण कालावधी राहील. 

 

या योजनेत अधिसुचित क्षेत्रातअधिसुचित फळपिकासाठी कुळाने भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. पिककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपीक विमा पोर्टल WWW.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठीआधार कार्ड. जमीन धारणा 7/128 (अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्रफळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटोबँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

 

शासनाच्या 11 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टेंक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहाभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे.

 

ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे. त्या क्षेत्राच्या सात/बारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस सातबारा व पिक पिक पेरा करणे नोंदीच्या आधारे पिक विम्याची बोगस प्रकरणे करणेदुसऱ्या शेतकऱ्याचे शेतीवर परस्पर अधिकृत भाडेकरार न करता विमा काढणेउत्पादनक्षमता वयाची फळबाग नसताना विमा काढणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा संनियत्रंण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनीची राहील.

 

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत व मृग बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासननिर्णय समजून घेऊन उपरोक्त अंतिम दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावेअसेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000


 वृत्त क्र. 666


अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यवाही


१६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त 


नांदेड, दि.२६ जून:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास आज मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक आयुक्त संजय चट्टे व सहायक आयुक्त राम भरकड यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत मिसे, अरूण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे नमुना सहायक बालाजी सोनटक्के व पोलिस स्टेशन इतवाराचे पो कॉ हरप्रीतसिंग सुकई यांचे पथकाने मे. डायमंड ट्रेडर्स, अमेर फंक्शन हॉलजवळ, देगलूर नाका, नांदेड या पेढीची तपासणी केली. 


तपासणीवेळी पेढीमध्ये सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० या व्यक्ती पेढीमध्ये हजर होते. पेढीच्या तपासणीमध्ये राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, AAA पानमसाला, मुसाफीर पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, सिग्नेचर पानमसाला, सितार गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण १६ लाख २८ हजार ४९ रुपये एवढ्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा पोलिस स्टेशन इतवारा, नांदेड यांचे ताब्यात देण्यात येवून संबंधित हजर व्यक्ती सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० यांचेविरूध्द अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे ,अशी माहिती सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

०००००



No comments:

Post a Comment

  #मुख्यमंत्रीरोजगारनिर्मितीयोजना #नांदेड