Monday, June 30, 2025

 वृत्त क्र. 678

शिवाजी महाराज पुतळा ते मुथा चौक रस्ता वाहतुकीस प्रतिबंध  

नांदेड, दि. 30 जून :- नांदेड शहरात रस्त्याच्या कामामुळे शिवाजी महाराज पुतळा ते मुथा चौक या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस येत्या 1 ते 15 जुलै पर्यंत प्रतिबंध करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून शिवाजी महाराज पुतळा-महावीर चौक ते मुथा चौक असा राहील. 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्‍हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित विभागाने पुढीलप्रमाणे उपाययोजना करुन 1 ते 15 जुलै 2025 कालावधीत नमुद  केलेल्‍या पर्यायी मार्गाने  सर्व प्रकारची वाहने  वळविण्‍यास  मान्‍यता दिली आहे. मुथा चौक ते महावीर चौक हा रस्‍ता एकेरी मार्ग असून रस्‍त्‍याचे काम होईपर्यंत सदर मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी वापरण्‍यासाठी सुद्धा परवानगी देण्‍यात आली आहे.  

नांदेड पोलीस अधिक्षक यांनी कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी रस्‍ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्ड, चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

00000

No comments:

Post a Comment