वृत्त क्र. 676
30 पेक्षा जास्त व 10 खाटांच्या रुग्णालयाचा आयुष्यमान भारत
व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश
नांदेड, दि. 30 जून :- नांदेड जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांचा आणि विशिष्ट 10 खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांचा एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. 30 खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि 10 खाटांचे एकल विशेषता रुग्णालयांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांमध्ये पात्र रुग्णालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी केले आहे.
यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळतील. नागरिकांना जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती https://www.jeevandayee.gov.in या संकेत स्तळावर उपलब्ध केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांचा तसेच खालील विशिष्ट एकल विशेषता (सिंगल स्पेशालिटी) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.
पात्र एकल विशेषता रुग्णालये (10 खाटांचे):
1. ईएनटी (नाक, कान, घसा)
2. नेत्ररोग शास्त्र (नेत्रविकार)
3. ऑर्थोपेडिक आणि पॉलीट्रॉमा (अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा)
4. बर्न (भाजणे)
5. बालरोग शस्त्रक्रिया
6. कर्करोग उपचार युनिट्स
7. नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स
8. हिमोडायलिसिस - मूत्रपिंड शास्त्र युनिट्स
योजनांचा उद्देश
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) : केंद्र सरकारची ही योजना देशभरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा समावेश आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य : महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे.
पॅनलवर समावेश प्रक्रिया:
पात्रता निकष
30 पेक्षा जास्त खाटा असलेली रुग्णालये आणि वर नमूद केलेल्या विशेषता असलेली 10 खाटांची एकल विशेषता रुग्णालये जी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटी निकषांची पूर्तता करतील. ती आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या पॅनलवर समावेशासाठी पात्र ठरतील.
यामध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे.
लाभ : पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील. यामुळे गंभीर आजारांवरील उपचार परवडणारे होतील आणि रुग्णांचे आर्थिक भार कमी होईल.
अर्ज प्रक्रिया: रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी https://www.jeevandayee.gov.in (MJPJAY) या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधावा.
सहाय्यकारी माहिती:
रुग्णालयांना अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्लोबल हेल्थ गुरु Global Health Guru या युट्युब चॅनेलवर "Hospital Empanelment Application Form भरण्याचे प्रशिक्षण व्हिडिओ" उपलब्ध आहे. रुग्णालय प्रतिनिधींनी YouTube वर Global Health Guru हे चॅनेल भेट देऊन व्हिडिओ पाहावा.
जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालये:
नांदेड जिल्ह्यातील अनेक रुग्णालये ज्यात प्रामुख्याने ३० खाटांची रुग्णालये व नमूद केलेल्या विशेषता असलेली 10 खाटांची रुग्णालये देखील या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरू शकतात.
संपर्क: अधिक माहितीसाठी किंवा पॅनलवर समावेशासाठी, कृपया डॉ. दिपेशकुमार शर्मा, जिल्हा रुग्णालय, दूरध्वनी: ८२७५०९५८१८ येथे संपर्क साधावा किंवा https://www.jeevandayee.gov.in वर भेट द्यावी.
टीप: रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी स्वतः पात्रता तपासावी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व https://www.jeevandayee.gov.in सदरील संकेत स्तळावर अर्ज करावा.
00000
No comments:
Post a Comment