वृत्त क्रमांक 547
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त
सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा
31 मे 2025 रोजी सायं. 5 वाजता, कुसुम सभागृह, नांदेड या ठिकाणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
नांदेड, दि. 28 मे :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार 31 मे 2025 रोजी सायं. 5 वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंतीवर्षा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतीक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचे लाभले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रजाहित दक्ष होत्या. त्यांनी अनेक घाट, मंदिरे जीर्णोद्धार, पाणपोई, धर्मशाळा इ. कामे केली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 31 मे रोजी नांदेड येथील कुसूम सभागृहात करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध लोककलाकार असतील.
००००००
No comments:
Post a Comment