वृत्त
क्रमांक
नांदेड तालुक्यात शुक्रवारी सरपंच पदाची सोडत
नांदेड दि. 23 एप्रिल :- नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे सन 2025 ते 2030 साठी आरक्षण सोडत शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय नांदेड उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात दुसरा मजला येथे 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. काढण्यात येणार आहे. सर्व संबंधीतानी तसेच सर्व माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी 25 एप्रिल रोजी वेळेवर तहसिल कार्यालय नांदेड उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्ष दुसरा मजला येथे उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडील अधिसूचनेनुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रिया यांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ चे पोटनियम 3 व 4 अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढील तपशिलानुसार अधिसूचीत करून दिले आहे.
सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी एकुण राखीव पद
18 असून त्यापैकी 50 टक्के महिलासाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 राखीव पद
असून ते महिलासाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग 17 राखीव पदापैकी 9 पदे
महिलांसाठी राखीव आहेत. खुला प्रवर्ग 37 राखीव पदापैकी 19 महिलांसाठी राखीव आहेत.
याप्रमाणे नांदेड तालुक्यात 73 एकुण राखीव पदांपैकी 50 टक्के महिलांसाठी 38 पदे
राखीव ठेवण्यात आली आहेत.
0000
No comments:
Post a Comment