Wednesday, March 5, 2025

 वृत्त क्रमांक 258

नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसादअ.वा. सूर्यवंशी

नांदेड दि. मार्च  नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित नांदेड ग्रंथोत्सवास ग्रंथसाहित्य  स्पर्धा परिक्षा ग्रंथ खरेदीस वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी .वा.सुर्यवंशी यांनी दिली.

उच्च  तंत्रशिक्षण विभागग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे 28 फेब्रु ते 1 मार्च 2025 पर्यंत दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेया ग्रंथोत्सवात वाचकांनी, ग्रंथप्रेमीनी ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

या ग्रंथोत्सवासाठी राज्यभरातून विविध प्रकाशनांची 20 स्टॉल लावण्यात आले होतेयात प्रमुख आकर्षण शासकीय प्रकाशन विक्री केंद्र होतेअधिकृत माहितीशिवाय माफक दरात शासकीय प्रकाशने असल्यामुळे वाचकांनी गर्दी केली होतीजिल्हाभरातील अनुदानीत, विना अनुदानीत वाचनालयांनी मोठ्या  प्रमाणावर ग्रंथ खरेदी केली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधक  वाचक प्रेमीसाठी लागणाऱ्या स्पर्धा  परीक्षेसाठीचे ग्रंथ या आलेल्या स्टॉलमधून खरेदी करण्यात आली.

ग्रंथोत्सवात प्रामुख्याने निर्मल प्रकाशन, नांदेडशांती पब्लिकेशन, पुणेप्रगती बुक डेपो, हिंगोलीसंदेश बुक डेपोपरभणीप्रितम प्रकाशन,जळगावपूजा बुक स्टॉल, अबंडआलवी बौध्द साहित्य भांडार, नांदेडमांडणीकर बुक स्टॉलसुशील बुक डेपो आदी प्रकाशकांनी विविध प्रकारचे ग्रंथसाहित्य  स्पर्धा परिक्षा ग्रंथ विक्रीस ठेवण्यात आले होते. ग्रंथोत्सवात मार्गदर्शन केलेले वक्ते सर्वश्री डॉ.व्यंकटेश काब्देमाजी आमदार गंगाधर पटनेसाहित्यिक श्रीकांत देशमुखप्रा.भगवंत क्षिरसागरपृथ्वीराज तौरसुचिता खल्लाळशारदा कदम आदिनी शुभेच्छा देऊन तसेच प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्यांच्या आवडीनुसार मोठया प्रमाणात ग्रंथ खरेदी केली.

महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र शासनाने‍ ग्रंथालय चळवळ वाढीस लागावी तसेच नवसाहित्यिकांना प्रेात्साहन मिळावेवाचन संस्कृती वाढावी यासाठी सन 2010 पासून राज्यभरात प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येतेराज्यातील संपूर्ण प्रकाशकांना यात सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात येतेवाचकांना एकाच ठिकाणी विविध प्रकाशकांची पुस्तके मिळत असल्यामूळे मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

नवसाहित्यचित्रकलाउजळणीबाराखडीमुलांच्या गोष्टीरंगकलाचित्रकलाअभ्यासाची पुस्तके, स्पर्धा परिक्षा  साहित्यपर पुस्तके यांची मोठया प्रमाणात विक्री झाल्याचे विविध प्रकाशकांनी   जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख                                                                                                                                  ...