Wednesday, March 5, 2025

 वृत्त क्रमांक 257

क्रीडा गुणांसाठी 5 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

नांदेड दि. मार्च  :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्यावतीने इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विदयार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. यासाठीचे ऑनलाईन प्रस्ताव 5 एप्रिल, 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

 

शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कडुन क्रीडा प्रस्ताव दरवर्षी विभागीय शिक्षण मंडळाकडे 30 एप्रिलपर्यंत सादर केले जातात. तथापी, शैक्षणीक वर्षे सन 2024-25 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी) या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर आयोजित करण्यात आले आहेत. या परिक्षेचा निकाल 15 मे, 2025 पर्यंत जाहीर करावयाचा आहे. त्यामुळे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत विभागीय शिक्षण मंडळाकडे 15 एप्रिल,2025 पर्यत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

 

तरी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षण व विदयार्थी यांनी त्यानुषंगाने 5 एप्रिल, 2025 पर्यंत आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रस्ताव भरून घ्यावेत. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रीडा गुणांचे प्रस्ताव क्रीडा कार्यालयामार्फत स्विकारले जाणार नाहीत. खेळाडूं विदयार्थ्यांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संस्था/ शाळा सर्वस्वी जबाबदार राहील, याची संबधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख                                                                                                                                  ...